Advertisement

भाजपने खोटे आकडे न सांगता पराभव मान्य करावा- बाळासाहेब थोरात

भाजपच्या नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करू नये. त्याऐवजी खुल्या दिलाने हा पराभव मान्य करावा, असं बाळासाहेब थोरात यांनी सुनावलं आहे.

भाजपने खोटे आकडे न सांगता पराभव मान्य करावा- बाळासाहेब थोरात
SHARES

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करू नये. त्याऐवजी खुल्या दिलाने हा पराभव मान्य करावा, असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजप (bjp) नेत्यांना सुनावलं आहे.

भाजपने  पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करतानाच ग्रामपंचायतीच्या निकालांची आकडेवारीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मतदान झालेल्या एकूण १२,७११ ग्रामपंचायतींपैकी ३१३१ (४४ टक्के) जागा जिंकल्याचा दावा भाजपने केला आहे. तर शिवसेनेच्या म्हणण्यानुसार भाजपाने २,६३२ जागा जिंकल्या असून ३,११३ जागांसह शिवसेना (shiv sena) पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. 

हेही वाचा- नाहीतर जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, शिवसेनेचा इशारा

या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करू नये. त्याऐवजी खुल्या दिलाने हा पराभव मान्य करावा. राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीपैकी ४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला आहे, असं बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी सांगितलं.

तर, ठाकरे सरकार लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहे. राज्याने विकासाची गती पकडली आहे. विरोधी पक्षाने आता स्वतःला सावरायला हवे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी बाजी मारली आहे. राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे? महाविकास आघाडी सरकारला जनतेचा ‘कौल’ नाही असं म्हणणाऱ्यांच्याच घरावरची ‘कौले’ जनतेने काढून टाकली आहेत.

ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआय, आयकरातील ‘कार्यकर्त्यां’ना हाताशी धरून महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडविता येणार नाही. महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या! असं म्हणत शिवसेनेने सामनातून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

(bjp must accept their defeat in maharashtra gram panchayat election 2021 says balasaheb thorat)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा