Advertisement

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच ठरली अव्वल

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असला, तरी मंगळवारी सकाळी खऱ्या अर्थाने या निवडणुकीतील निकालाचं चित्र स्पष्ट झालं.

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच ठरली अव्वल
SHARES

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असला, तरी मंगळवारी सकाळी खऱ्या अर्थाने या निवडणुकीतील निकालाचं चित्र स्पष्ट झालं. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला असला, तरी या निवडणुकीत शिवसेनाच (shiv sena) अव्वल ठरल्याचं आता स्पष्ट झालं आहे. तर विरोधी पक्ष भाजप दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.

ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होताच सर्वच नेतेमंडळींनी सरपंचपद आपल्या गटाला मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बहुमत नसलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जुळवाजुळवीला सुरूवात झाली आहे. निकालानंतर सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत येत्या १५ फेब्रुवारीच्या आत काढली जाईल. 

महाराष्ट्रातील १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (congress) हे तिन्ही घटकपक्ष एकत्रित लढतील अशी अटकळ बांधण्यात येत होती. परंतु या तिन्ही पक्षांनी आपापल्या प्रभाव क्षेत्रात निवडणूक लढवत मोठ्या चातुर्याने अपेक्षित निकाल पदरी पाडून घेतले आहेत. त्यात शिवसेना हा सर्वाधिक यशस्वी पक्ष ठरला आहे.

हेही वाचा- ग्रामसभा पूर्ववत करण्यास मंजुरी- हसन मुश्रीफ

(maharashtra) एकूण १२,७११ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ३ हजार ११३ ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मागे सोडत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून भाजपने २ हजार ६३२ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने २४०० जागा जिंकत तिसरा आणि १८२३ जागा जिंकत काँग्रेसने चौथा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३६ जागेवर यश संपादन केलं आहे. उर्वरीत २ हजार ३४४  जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.  

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला असून, भाजपच्या (bjp) नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करू नये. त्याऐवजी खुल्या दिलाने पराभव मान्य करावा, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

तर, ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.

(shiv sena wins most seats in maharashtra gram panchayat election result 2021)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा