Advertisement

ग्रामसभा पूर्ववत करण्यास मंजुरी- हसन मुश्रीफ

कोरोना संदर्भातील विविध मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणं पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचं आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामसभा पूर्ववत करण्यास मंजुरी- हसन मुश्रीफ
SHARES

कोरोना संदर्भातील विविध मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणं पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचं आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यानुसार येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र (maharashtra) ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. राज्य सरकारने यापूर्वीच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती रद्द केल्यामुळे नव्याने सोडती जाहीर होणार आहेत. त्यामुळे विजयी उमेदवारांना सरपंचपदाचे वेध लागले आहेत. त्यानुसार मतदानाच्या दिवसानंतर पुढील ३० दिवसांमध्ये म्हणजे १५ फेब्रुवारीपर्यंत सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

हेही वाचा- तिन्ही पक्षांना टक्कर देत भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष- देवेंद्र फडणवीस

यासंदर्भात अधिक माहिती देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) म्हणाले, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) च्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान ४ ग्रामसभांचं आयोजन करणं बंधनकारक आहे. अशाप्रकारे ग्रामसभेचं आयोजन न केल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच, आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करणेची तरतूद आहे.

तथापी, कोरोना विषाणूच्या (coronavirus) प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश, अधिसूचना यानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभा व संमेलनांवर बंदी घालण्यात आली  होती. त्याचप्रमाणे ग्रामसभा घेण्यास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता येत असून बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे, असंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

ग्रामविकासात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना असलेलं अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता ग्रामसभांचं पूर्वीप्रमाणे आयोजन होणं गरजेचं आहे. कोरोना नियंत्रणासाठीच्या सर्व नियमांचं पालन करुन ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती देण्यात येत असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

(maharashtra rural development minister hasan mushrif order to set new gram sabha after gram panchayat election 2021)

हेही वाचा- राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जाणार नाही, शिवसेनेला टोला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा