Advertisement

राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जाणार नाही, शिवसेनेला टोला

जय हिंद! जय बांगला म्हणत शिवसेनेने चक्क पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जाणार नाही, शिवसेनेला टोला
SHARES

जय हिंद! जय बांगला म्हणत शिवसेनेने चक्क पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जाणार नाही, असा टोला भाजप (bjp) नेते निलेश राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांना लगावला आहे.

यासंदर्भात ट्विट करून निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, बिहार निवडणूक - नोटा १.६८% मतं, तर शिवसेनेला ०.०५% मतं, गोवा निवडणूक - शिवसेना - ४० पैकी फक्त ३ उमेदवार उभे केले आणि त्या ३ उमेदवारांची एकत्र करून एकूण मतं ७९२, महाराष्ट्रात शिवसेनेला २०१९ मध्ये युती करूनसुद्धा फक्त १६% मतं मिळाली. पण संजय राऊत यांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही. 

हेही वाचा- शिवसेनेचं ‘जय बांगला’, लढवणार ‘इथं’ही निवडणूक

शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुशांत सिंह राजपूत प्रकरण, मुंबई विरूद्ध परप्रांतीय, भाजप विरोध अशा मुद्द्यांवर शिवसेनेला चांगला फायदा मिळेल, अशी अपेक्षा जाणकार व्यक्त करत होते. शिवसेनेने (shiv sena) या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी एकूण २२ उमेदवार उभे केले होते. मात्र हे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले. एवढंच नाही, तर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षा देखील कमी मते मिळाली. बहुतेक सर्वच उमेदवारांचं डिपाॅझिटही जप्त झालं. 

महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढवण्याच्या फायदा मिळत नसताना देखील शिवसेनेने आता पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. महाराष्ट्रात एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या शिवसेनेने भाजपविरोधात आघाडी उघडत पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवल्यास त्याचा अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फायदा होऊ शकतो. त्यामुळे सध्या अडचणीत असलेल्या तृणमूल काँग्रेसकडून शिवसेनेला मदत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(bjp leader nilesh rane slams shiv sena and sanjay raut over west bengal assembly election)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा