Advertisement

घासून नाय, तर विरोधकांची ठासून! ‘या’ ग्रामपंचायतींमध्ये मनसेचा सरपंच!!

मनसेच्या शिलेदारांनी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवल्याचे सकारात्मक परिणाम त्यांना काही ग्रामपंचायतीत दिसून येत आहेत.

घासून नाय, तर विरोधकांची ठासून! ‘या’ ग्रामपंचायतींमध्ये मनसेचा सरपंच!!
SHARES

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हळुहळू हाती येत असताना गाव पातळीवर अत्यंत कमकुवत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्ताधारी पक्षांना धक्का देण्यास सुरूवात केली आहे. मनसेच्या शिलेदारांनी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवल्याचे सकारात्मक परिणाम त्यांना काही ग्रामपंचायतीत दिसून येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी सर्व मनसे पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणूक एकजुटीने लढवण्याचे निर्देश दिले होते, त्याचेच हे परिणाम असल्याचं म्हटलं जातआहे.

महाराष्ट्रातील (maharashtra) २,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार १५ जानेवारी रोजी मतदान झालं. या निवडणुकीचे निकाल हळुहळू हाती येत आहेत. त्यापैकी हाती आलेल्या निकालांमध्ये अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मधील मनसेचे ०७ पैकी ०४ सदस्य विजयी झाल्याने या ग्रामपंचायतीत मनसेचा सरपंच विराजमान होणार आहे. यावर घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अशी प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा- शिवसेनेचं ‘जय बांगला’, लढवणार ‘इथं’ही निवडणूक

त्यापाठोपाठ यवतमाळमधील आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. या ग्रामपंचायतीत मनसेचे ०७ पैकी ०६ उमेदवार विजयी झाले आहेत. अमरावतीतील अचलपूर तालुक्यातील 'खैरी सावंगी वाढोणा' गट ग्रामपंचायतीमध्ये मनसेचे ०७ पैकी ०७ उमेदवार विजयी झाले आहेत. संपूर्ण ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आल्याने 'मनसे'ने (mnsगावकऱ्यांचे आभार मानले आहेत. 

अविनाश पालवे ह्यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीवर देखील मनसेचा भगवा फडकला आहे. येथील मनसेचे ०९ सदस्य विजयी झाले आहेत. सोलापूरमध्ये अनिल माने यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील 'हिवरे' ग्रामपंचायत निवडणूकीत ०७ पैकी ०५ जागा जिंकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (maharashtra navnirman sena) दणदणीत विजय मिळविला आहे. 

अशा तऱ्हेने आतापर्यंत हाती आलेल्या निकालांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ११ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे, तर अनेक ग्रामपंचायतीमध्ये मनसेचे शेकडो सदस्य निवडून आले आहेत.

(mns performance in maharashtra gram panchayat election results 2021)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा