Advertisement

तिन्ही पक्षांना टक्कर देत भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे अंतिम निकाल हाती येण्यास अवघ्या काही तासांचाच अवधी शिल्लक उरलेला असताना राज्यात भाजपच एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

तिन्ही पक्षांना टक्कर देत भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष- देवेंद्र फडणवीस
SHARES

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे अंतिम निकाल हाती येण्यास अवघ्या काही तासांचाच अवधी शिल्लक उरलेला असताना राज्यात भाजपच एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एवढंच नाही, तर महाविकास आघाडीविरोधात लोकांच्या मनात तीव्र नापसंती असल्यानेच हे तिघे पक्ष एकत्र येऊनही मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सांगितलं की, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल सगळ्याच ठिकाणी जनतेने भाजपला भरभरून समर्थन दिलं आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवून देखील भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरलेला आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारविरोधात लोकांच्या मनात किती रोष आहे, हेच दिसून येत आहे.

हेही वाचा- ग्रामसभा पूर्ववत करण्यास मंजुरी- हसन मुश्रीफ

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जागा वाटून घेत आपापल्या भागात उमेदवार उभे केले होते. त्यांना त्या त्या ठिकाणी यश मिळालं असलं, तरी भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात यश मिळालेलं आहे. त्यामुळेच या तिन्ही पक्षांच्या तुलनेत भाजपच सरस ठरत आहे. तळागाळात काम करणारे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची ही मेहनत आहे. त्यामुळेच भाजपला हे यश मिळू शकलेलं आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच (bjp) किती विस्तारला आहे, हेच यातून दिसतं. सत्तेत नसूनही भाजपने मिळवलेलं हे यश आमच्यासाठी मोठं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 
(opposition leader devendra fadnavis reaction on maharashtra gram panchayat election result 2021)

हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच ठरली अव्वल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा