Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
41,102
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

‘या’ दिवशी राज्यातील सत्तेला सुरूंग, चंद्रकांत पाटलांचं भाकीत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधतानाच हे सरकार केव्हा कोसळणार याविषयी देखील भाकीत केलं आहे.

‘या’ दिवशी राज्यातील सत्तेला सुरूंग, चंद्रकांत पाटलांचं भाकीत
SHARES

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधतानाच हे सरकार केव्हा कोसळणार याविषयी देखील भाकीत केलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर चांगलंच तोंडसुख घेतलं. ते म्हणाले, राज्यात कोरोना (coronavirus) संसर्गाचा फैलाव होत असताना सरकार त्याला नियंत्रणात ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. कोरोना संसर्गाचा सामना करण्याची सरकारकडे कोणत्याही प्रकारचं नियोजन दिसत नाही. सरकार पातळीवरील निर्णय प्रक्रिया थांबल्याने प्रशासनात सावळागोंधळ माजला आहे. 

हेही वाचा- महाराष्ट्राला पुरेशा लसी मिळणार नसतील तर.., मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, द्धव ठाकरे (uddhav thackeray) हे एका पक्षाचे प्रमुख म्हणून जन्माला आले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री केलं. वस्तुस्थिती अशी आहे की, उद्धव ठाकरे यांना अनेक गोष्टी माहीतच नाहीत. स्वत: पीपीई किट घालून फिल्डवर उतरल्याशिवाय त्यांना तळागाळातील प्रश्न कळणार नाहीत.

तीन पायांवर चालणारं हे सरकार किती अस्थिर आहे, हे त्यांच्या कारभारावरून दिसून येतं. त्यामुळे हे सरकार पडणार असल्याचं आठवीतील मुलगाही सांगू शकेल. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होत असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. हे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असं भाकीत चंद्रकांत पाटील यांनी केलं.

याच ठिकाणी आधीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी देखील असाच विश्वास व्यक्त केला होता. तुम्ही फक्त भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून इथला कार्यक्रम करा, सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. तर या आधीच्या दोन सभातही सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. 

(bjp maharashtra president chandrakant patil slams maha vikas aghadi in pandharpur bypoll rally)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा