Advertisement

अजूनही काँग्रेस नेहरू मनोवृत्तीतून बाहेर पडलेली नाही- आशिष शेलार

आम्ही सगळे एक आहोत असं म्हटल्यावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, राजू शेट्टी यांच्या पोटात का दुखलं? असा सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

अजूनही काँग्रेस नेहरू मनोवृत्तीतून बाहेर पडलेली नाही- आशिष शेलार
SHARES

सचिन तेंडुलकर आणि लतादीदींनी केलेलं ट्विट हे कुणाच्या बाजूने नाही तर ते आम्ही सारा देश एक आहोत असा संदेश देणारं आहे. आम्ही सगळे एक आहोत असं म्हटल्यावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, राजू शेट्टी यांच्या पोटात का दुखलं? असा सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार म्हणाले की, कुणी कुणाबद्दल काय ट्विट करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी जे ट्विट केलं त्यात कुणाची बाजू न घेता किंवा कुणाच्या विरोधात न जाता आमच्या अंतर्गत विषयात बोलू नका आम्ही एक आहोत, असं म्हटलं आहे. मग आम्ही एक आहोत असं म्हटल्यावर यांच्या पोटात दुखण्याची गरज काय? आम्ही एकदिलाने विचार करू आम्ही आमचं आमचं बघून घेऊ हे म्हटल्यावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राजू शेट्टी यांना त्रास का होतोय?

हेही वाचा- ठाकरे सरकार करणार सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी?

आमच्या शेतकऱ्यांचे किंवा देशातल्या प्रश्नांची चर्चा परदेशात व्हावी, हीच यांची इच्छा आहे का? अजूनही नेहरू मनोवृत्तीतून काँग्रेस बाहेर पडलेली नाही आणि आज शिवसेनेने काँग्रेससोबत (congress) हातमिळवणी केली आहे. जे अख्खा महाराष्ट्र बघत आहे, अशी टीका देखील आशिष शेलार यांनी केली.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेणारं ट्विट आंततराष्ट्रीय पाॅप गायिका रिहानाने केल्यावर देशभरात खळबळ माजली. आंदोलनाच्या विरोधात आणि बाजूने बोलणाऱ्या सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया येऊ लागल्या. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी देखील सरकारची बाजू मांडणारं ट्विट केल्यावर त्यांच्यावर ट्रोलर्स तुटून पडले. 

त्यातच केंद्राने सरकारच्या बाजूने प्रतिक्रिया देण्यासाठी काही सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला आहे. या सगळ्या प्रकारावर देशात गदारोळ सुरू असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil desmukh) यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यावरून देखील महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे.

(bjp mla ashish shelar criticized congress and shiv sena on celebrity tweets)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा