Advertisement

तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती, अमित शहांची टीका

आम्ही देखील तत्त्वांची मोडतोड करून तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती, अमित शहांची टीका
SHARES

शिवसेनेने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तापी नदीत बुडवून महाराष्ट्रात सत्ता मिळवली आहे. भाजप तत्त्वांसाठी राजकारणात आलेला पक्ष आहे. आम्ही देखील तत्त्वांची मोडतोड करून तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर (shiv sena) जोरदार टीका केली. सिंधुदुर्गात उभारण्यात आलेल्या भाजप नेते नारायण राणे यांच्या लाइफलाइन वैद्यकीय महाविद्यालयाचं अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तापदांच्या वाटपावरून नाराज होत शिवसेनेने भाजपासोबत (bjp) युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी करत सरकारची स्थापना केली. भाजपाने मुख्यमंत्रीपदासह सत्तेत ५०-५० पदांचं वाटप करण्याचं वचन दिलं होतं, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. सिंधुदुर्गात भाषण करताना अमित शहा यांनी शिवसेना नेतृत्वासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. 

हेही वाचा- आपलं क्षेत्र सोडून इतर विषयावर बोलताना काळजी घ्यावी, शरद पवारांचा सचिनला सल्ला

यावेळी अमित शहा म्हणाले, ते म्हणतात की, मी बंद खोलीत वचन दिलं होतं. पण मी बंद दाराआड राजकारण करत नाही. जे करतो ते सगळ्यांसमोर करतो. कारण मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे. कुणालाही घाबरत नाही. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अडीचपट मोठा फोटो वापरून प्रचार केला. मोदीजींच्या नावावर मतं मागितली. माझ्यासोबत सभा झाली. मोदीजींसोबत सभा झाली. प्रत्येक ठिकाणी आम्ही बोललो की एनडीएचं सरकार निवडून द्या. फडणवीसजी मुख्यमंत्री होणार. त्यावेळी मात्र काहीच बोलले नाही. परंतु नंतर दगाबाजी केली.

आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसं आहोत. अशा प्रकारचं खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिलं होतं की एनडीएचं सरकार आलं, तर मुख्यमंत्री नितीश कुमार होणार. आमच्या जागा जास्त येऊनही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं, अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला उत्तर दिलं.

महाराष्ट्रातील जनतेने नेरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारसाठी जनादेश दिला होता. मात्र या जनादेशाचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं. राज्यात हे तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार तयार झालं असून या ऑटोरिक्षाचं प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे, अशा शब्दांत महाविकास आघाडी सरकारवर अमित शहा यांनी टीका केली.

(amit shah slams shiv sena on cm post assurance in vidhan sabha election)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा