Advertisement

अदानी पवारांच्या घरी येऊन गेल्यावर… राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

अदानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी येऊन गेल्यावर मात्र सरकारने आपली भूमिका बदलली, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केला

अदानी पवारांच्या घरी येऊन गेल्यावर… राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
SHARES

लाॅकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना आलेल्या वीज बिल दरवाढीच्या प्रश्नावर राज्यात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला होता. वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केलं होतं. आम्ही सरकारकडे दादही मागितली होती. त्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. परंतु अदानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी येऊन गेल्यावर मात्र सरकारने आपली भूमिका बदलली, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी शनिवारी केला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांना भाजपकडून वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात येत असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, वीज बिलाबद्दल पहिलं आंदोलन आमच्या पक्षानं केलं. भाजपा (bjp) काय पुढे येतंय. या सगळ्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल झाले. सर्वसामान्यांनी याचा विचार केला पाहिजे की, त्यांच्यासाठी रस्त्यावर कोण उतरलं. वीज कंपन्यांकडून जी बिलं येताहेत, ती प्रत्येकाला येत आहे. पत्रकारही त्यातून सुटलेले नाहीत. लॉकडाऊनमध्ये वीज कंपन्यांना नफा झाला नाही, म्हणून तुम्ही नागरिकांना पिळणार असाल, छळणार असाल तर जनतेने का सहन करायचं? सरकारमधील मंत्री म्हणाले होते, कपात करू. पण नंतर एकदम घुमजाव झालं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा- न्यायालय म्हणालं राज ठाकरे हजर झाले नसते तर...

वाढीव वीज बिल माफ करण्यात यावं म्हणून आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा केला, राज्यपालांना जाऊन भेटलो. तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार (sharad pawar) यांना याप्रश्नी भेटायला सांगितलं. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी वीज कंपन्यांच्या नावाने पत्रं मागवली, आम्ही पत्रं पाठवली तर पुढच्याच दिवशी अदानी पवारांच्या घरी येऊन गेले. त्यानंतर सरकारचीही भूमिका आली की नागरिकांना वीजबील भरावंच लागेल. सर्व वीज कंपन्यांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करतंय. आता प्रश्न आंदोलकर्त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विचाराल की सरकारला? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

लोकांसाठी नाही तर एकमेकांना शह-काटशह देण्यासाठी राज्यात सध्या इतर राजकीय पक्षांची आंदोलनं सुरु आहेत. शिवसेनेने (sharad pawar) इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्याआधी वीज बिल माफ करावं आणि भाजपने इंधन दरवाढीवर केंद्राशी बोलावं ना? तुमचंच सरकार आहे ना! असा सल्ला देखील राज ठाकरे यांनी दिला.

(mns chief raj thackeray questions over gautam adani and sharad pawar meeting on electricity bill in maharashtra)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा