Advertisement

न्यायालय म्हणालं राज ठाकरे हजर झाले नसते तर...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी टोलनाक्यावरील तोडफोड प्रकरणात वाशी न्यायालयाने शनिवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे.

न्यायालय म्हणालं राज ठाकरे हजर झाले नसते तर...
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी टोलनाक्यावरील तोडफोड प्रकरणात वाशी न्यायालयाने शनिवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राज ठाकरे (raj thackeray) यांना जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे. 

२६ जानेवारी २०१४ रोजी राज ठाकरे यांनी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित मनसेच्या मेळाव्यात टोल नाक्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांविरोधात आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनात मनसेच्या (mns) कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाक्याची तोडफोड केली होती. प्रक्षोभक भाषण करून कार्यकर्त्यांना तोडीफोडीस चिथावणी दिल्याबद्दल राज ठाकरे यांच्यासह मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह ६ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हेही वाचा- विधानसभा अध्यक्षपद कुणाकडे जाणार?, शरद पवार म्हणाले...

त्यानंतर राज ठाकरे यांना २०१८ आणि २०२० मध्ये समन्स आणि वॉरंट जारी करण्यात आलं होतं. तरीही राज ठाकरे न्यायालयात हजर झाले नव्हते. जानेवारी महिन्यात न्यायालयाने हे वॉरंट रद्द केलं असलं, तरी खटल्याच्या सुनावणीला सुरुवात करण्यासाठी राज ठाकरे यांना ६ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने काढले होते. राज ठाकरे ६ फेब्रुवारीला न्यायालयात हजर झाले नाही, तर पुढील कारवाई केली जाईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.  

त्यामुळे शनिवारी राज ठाकरे (raj thackeray) वाशी न्यायालयात हजर झाले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान मी भाषण केलं असलं, तरी मला गुन्हा मान्य नाही, असं राज ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितलं. यानंतर या प्रकरणात जामिनाचा अर्ज केल्यानुसार न्यायालयाने राज ठाकरे यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार असून या सुनावणीदरम्यान राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्याची आवश्यता नाही. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा