Advertisement

गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

अनिल देशमुख यांनी स्वतः twitter वरून ही माहिती दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

राज्याच्या गृहमंत्र्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. अनिल देशमुख यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. देशमुख यांनी स्वतः twitter वरून ही माहिती दिली.

"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण माझी तब्येत ठीक आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्या", असं त्यांनी कळवलं आहे.

दरम्यान कोविडचे लसीकरण वेगानं सुरू आहे. परंतू ब्रिटन, ब्राझीलमध्ये ज्या पद्धतीनं कोरोनाचा संसर्ग पसरत आहे आणि मृत्यू होत आहेत ते पाहता आपण बेसावध न राहता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणाच्या वेळी सांगितलं.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, समूह प्रतिकारशक्तीमुळे (हर्ड इम्युनिटीमुळे) आपल्याकडे लक्षणीयरित्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असं जर आपण मानत असूत तर अशाच प्रकारे समूह प्रतिकारशक्तीनंतर देखील युरोपमध्ये संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते हे लक्षात घ्यावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.



हेही वाचा

विधानसभा अध्यक्षपद कुणाकडे जाणार?, शरद पवार म्हणाले...

महाराष्ट्र काँग्रेसची धुरा नाना पटोलेंच्या हाती, दिल्लीतून शिक्कामोर्तब

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा