Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

महाराष्ट्र काँग्रेसची धुरा नाना पटोलेंच्या हाती, दिल्लीतून शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या हाती काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसची धुरा नाना पटोलेंच्या हाती, दिल्लीतून शिक्कामोर्तब
SHARES

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या हाती काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. या नियुक्तीमुळे महाराष्ट्र काँग्रेसला बऱ्याच काळानंतर पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला आहे. 

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होणार असल्याची चर्चा सुरू होती. नव्या नेतृत्वाची चाचपणी करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसनं राज्यात प्रतिनिधीही पाठवले होते. या शर्यतीत अनेक नावं आघाडीवर होती. राज्याच्या कानाकोपऱ्या पसरलेल्या काँग्रेसला नवीन ऊर्जा देतानाच महाविकास आघाडीतील शिवसेना (shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटकपक्षांशी योग्य समन्वय साधू शकणारं व्यक्तीमत्त्व शोधण्यात येत होतं.

अखेर काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी निवड करून चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सोबतच विदर्भात कुमकुवत झालेल्या काँग्रेसला मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही म्हटलं जात आहे.

हेही वाचा- महाराष्ट्र काँग्रेसला मिळणार नवं नेतृत्व?, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा

नाना पटोले यांनी काँग्रेसपासून (congress) राजकारणाची सुरुवात केली. पण पक्षातील अंतर्गत वादातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभेत गेले. 

मात्र ५ वर्षांच्या आतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांनी  पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ साली पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर आता विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा काँग्रेसच्याच नेत्याची निवड होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) देखील या पदावर आपला हक्क सांगितल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत यावरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत धुसफूस होण्याची शक्यता आहे.

(nana patole appointed as president of maharashtra pradesh congress committee)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा