Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

याला म्हणतात ‘टाइमपास’, मनसे नेत्याचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ‘टाइमपास टोळी’ अशी हेटाळणी करणारे युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना मनसेच्या नेत्याने रोकठोक प्रत्युत्तर दिलं आहे.

याला म्हणतात ‘टाइमपास’, मनसे नेत्याचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (mns) ‘टाइमपास टोळी’ अशी हेटाळणी करणारे युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना मनसेच्या नेत्याने रोकठोक प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारणीच्या कामात होत असलेली दिरंगाई हा टाइमपास नव्हे, काय असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांच्या स्मारक उभारणीसाठी मुंबईतील दादर, शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा ताब्यात घेण्यात आलेली आहे. स्मारकाच्या कामासाठी निधीची देखील तरतूद करण्यात आलेली आहे. तरीही स्मारकाचं काम अत्यंत धीम्या गतीने होत असल्याचा आराेप अधूनमधून मनसेकडून करण्यात येतो. 

हेही वाचा- मनसे पक्ष आहे की टोळी? आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

हाच धागा पकडून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी, सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर  निवास ताब्यात घेणं व अनेक वर्षे तिथं स्मारक न करणं याला ‘टाइमपास’ म्हणतात, असं ट्विट करत आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांना टोला लगावला आहे.

तत्पूर्वी मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर खंडणीखोरीचे आरोप केले होते. शिवसेना (shiv sena) ही फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मूलनासाठी घेण्यात येणारा आकार… असं या पावतीवर लिहिण्यात आल्याचं संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी दाखवून दिलं होतं.  

त्याबाबत विचारलं असता, मनसे हा नेमका पक्ष आहे की संघटना आहे, हेच मला कळत नाही. ही 'टाइमपास टोळी' आहे असंच म्हणावं लागेल. ह्यांच्याकडं स्वत:चे कार्यकर्ते देखील लक्ष देत नाहीत. त्यामुळं आपणही लक्ष देण्याची गरज नाही, अशा मोजक्या शब्दांत अत्यंत बोचरी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा