Advertisement

मनसे पक्ष आहे की टोळी? आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येते, परंतु त्यावर आतापर्यंत कधीही भाष्य न करणारे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच मनसेच्या आरोपांवर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

मनसे पक्ष आहे की टोळी? आदित्य ठाकरेंची बोचरी टीका
SHARES

मुंबई महापालिका निवडणूक (bmc election) काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसलेल्या पक्षांतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळही सुरू झाला आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येते, परंतु त्यावर आतापर्यंत कधीही भाष्य न करणारे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच मनसेच्या आरोपांवर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी महापालिका अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देशपांडे यांनी शिवसेनेवर खंडणीखोरीचे आरोप केले. शिवसेना (shiv sena) ही फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मूलनासाठी घेण्यात येणारा आकार… असं या पावतीवर लिहिण्यात आल्याचं देशपांडे यांनी दाखवून दिलं. 

तर त्याआधी केलेल्या एका ट्वीटमध्ये संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी शिवसेनेला 'विरप्पन गँग' असंही म्हटलं होतं. विरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असं संदीप देशपांडे यांचं ट्विट आहे.

हेही वाचा- रोहीत शर्मावर आक्षेपार्ह शब्दांत टीका, कंगनावर ट्विटरची अॅक्शन

याबाबत महापालिकेत आलेल्या आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांना विचारलं असता, मनसे हा नेमका पक्ष आहे की संघटना आहे, हेच मला कळत नाही. ही 'टाइमपास टोळी' आहे असंच म्हणावं लागेल. ह्यांच्याकडं स्वत:चे कार्यकर्ते देखील लक्ष देत नाहीत. त्यामुळं आपणही लक्ष देण्याची गरज नाही, अशा मोजक्या शब्दांत अत्यंत बोचरी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, मनसेचे डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर शिवसेना विरूद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त होतआहे. येत्या काळात पक्षाला गळती लागू नये म्हणून लोकसभानिहाय समित्या स्थापन करण्याचे निर्देश नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी दिले आहेत. त्यातील एका लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर टाकण्यात आली आहे.

(aaditya thackeray first time reaction on mns alligation)

हेही वाचा- “शरजीलला बेड्या पडतील? पण सेक्युलर ए आझम पवारांची परवानगी घेतलीय ना?”

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा