Advertisement

रोहीत शर्मावर आक्षेपार्ह शब्दांत टीका, कंगनावर ट्विटरची अॅक्शन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रोहीत शर्मा याच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानंतर ट्विटरने ताबडतोब अॅक्शन घेत कंगनाचे ट्विट डिलिट केले आहेत.

रोहीत शर्मावर आक्षेपार्ह शब्दांत टीका, कंगनावर ट्विटरची अॅक्शन
SHARES

आंतरराष्ट्रीय पाॅप स्टार रिहानाने दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणारं ट्विट केल्यापासून आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि विरोधात असलेल्यांमध्ये जबरदस्त ट्विटरवाॅर सुरू आहे. यांत अर्थातच अभिनेत्री कंगना रणौत आघाडीवर असून याच प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रोहीत शर्मा याच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानंतर ट्विटरने ताबडतोब अॅक्शन घेतली आहे.

पाॅप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करून आम्ही यावर काही बोलत का नाही? असा प्रश्न उपस्थित केला होता. या ट्विटमुळे जगाचं लक्ष या आंदोलनाकडे वेधलं गेलं. पाठोपाठ मिया खलीफा, स्वीडनमधील किशोरवयीन पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. 

त्यावर, “कोणीही बोलत नाही कारण ते अतिरेकी आहेत, शेतकरी नाहीत.” ज्यांना भारताची विभागणी करायची आहे. जेणेकरुन चीन आपल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवेल. शांत बस मूर्ख. आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही जे स्वत:च्या देशाला विकतील, असं ट्विट केलं होतं.

हेही वाचा- हॉलिवूड पॉप स्टारकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, कंगना बोलली, "शांत बस मूर्ख"

याचप्रकारे, जेव्हा केव्हा आपण एकत्र उभं राहिलो आणि त्यावेळेला उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भारत आणखी ताकदवान झाला आहे. आपल्या देशात शेतकरी महत्त्वाची भूमिका निभावतात. मला खात्री आहे की प्रत्येकजण आपली भूमिका योग्य तऱ्हेने निभावून यावर देखील नक्कीच उपाय शोधतील, असं ट्विट रोहीत शर्माने केलं होतं.

त्याला अत्यंत आक्षेपार्ह भाषेत कंगनाने प्रतिउत्तर दिलं. रोहीतचं ट्विट रिट्विट करून कंगना म्हणाली, या क्रिकेटपटूंची भाषा धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी का वाटतेय? शेतकरी अशा कायद्याविरोधात का जात आहे, जो त्यांच्यासाठीच क्रांतीकारी ठरणार आहे, हे दहशदवादी आहेत, जे गोंधळ घालत आहेत. असं बोलायची भीती का वाटतेय? 

त्याआधी अभिनेता दिलजीत दोसांजला उद्देशून, माझं एकच काम आहे देशभक्ती. तेच मी दिवसभर करत असते. मी तेच करत राहणार. पण खलिस्तानी तुला तुझं काम करु देणार नाही, असं ट्विट कंगनाने केलं होतं. 

कंगनाच्या या टि्वटसमुळे टि्वटरच्या नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे हे टि्वटस हटवण्यात आले.

(twitter delete tweets of actress kangana ranaut for using abusive language against cricketer rohit sharma)

हेही वाचा- “शरजीलला बेड्या पडतील? पण सेक्युलर ए आझम पवारांची परवानगी घेतलीय ना?”


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा