Advertisement

हॉलिवूड पॉप स्टारकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, कंगना बोलली, "शांत बस मूर्ख"

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हॉलिवूडमधून पाठिंबा मिळत आहे. हॉलिवूड पॉप स्टार रिहाना यांनी ट्वीट करून शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर भाष्य केलं आहे.

हॉलिवूड पॉप स्टारकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, कंगना बोलली, "शांत बस मूर्ख"
SHARES

दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचं आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि आंदोलनं पसरण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी निषेध स्थळांना बालेकिल्ल्यात रुपांतर केलं आहे. तसंच निषेधाच्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हॉलिवूडमधून पाठिंबा मिळत आहे. हॉलिवूड पॉप स्टार रिहाना यांनी ट्वीट करून शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर भाष्य केलं आहे. "आम्ही याबद्दल का बोलत नाही?" असं लिहून तिनं इंटरनेटवरील बंदीची बातमी सामायिक केली. रिहानाने यात #Farmprotest  वापरला आहे. पॉप स्टारच्या या ट्विटवरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मात्र भडकली आहे.

कंगनानं ट्विट केलं आहे की, "कोणीही बोलत नाही कारण ते अतिरेकी आहेत, शेतकरी नाहीत." ज्यांना भारताची विभागणी करायची आहे. जेणेकरुन चीन आपल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवेल. शांत बस मूर्ख. आम्ही तुमच्यासारखे मूऱ्क नाही जे स्वत:च्या देशाला विकतील.''

रिहाना ज्वलंत प्रश्नांवर प्रतिक्रिया देत आहे. मंगळवारी त्यांनी म्यानमारमध्ये सैन्याच्या ताब्याबाबत ट्विट केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की, "म्यानमारसाठी मी प्रार्थना करते.". कंगना रणौत देखील शेतकरी चळवळीबद्दल सातत्यानं ट्विट करत आहे.

आपल्या ट्विटमध्ये तिनं शेतकरी चळवळीला पाठिंबा दर्शवल्याबद्दल अनेक वेळा अभिनेता दलजित दोसांझ, प्रियांका चोप्रा आणि स्वरा भास्कर यांना लक्ष्य केलं आहे.

आंदोलन करणारे शेतकरी ३ नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन करीत आहेत. ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांनी ३ तास देशव्यापी तपासणीची घोषणा केली आहे.हेही वाचा

कोर्टानं बजावले कंगना विरोधात समन्स

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा