Advertisement

महाराष्ट्र काँग्रेसला मिळणार नवं नेतृत्व?, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा

काँग्रेस आमदार आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसला मिळणार नवं नेतृत्व?, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा
SHARES

काँग्रेस आमदार आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष (maharashtra vidhan sabha president) नाना पटोले यांनी गुरूवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांच्या हाती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

नाना पटोले यांनी बुधवारी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली. त्यानंतर गुरूवारी महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांनी सायंकाळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, पक्षाने दिलेल्या आदेशाचं पालन करत मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर मी मंत्रिपद किंवा कुठलंही पद मिळावं अपेक्षा ठेवलेली नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे माझ्या हाती देण्यात येतील की नाही, याबाबत देखील पक्षाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही. पक्ष जो आदेश देईल. त्याचं मी पालन करेन. विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना मी त्या खुर्चीला जनतेची खुर्ची बनवली याचा मला अभिमान आहे, असं नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा- मनसे पक्ष आहे की टोळी? आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

त्याचप्रमाणे, तुमच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार की दुसऱ्या पक्षाकडे जाणार? या प्रश्नावर ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष निवडण्याची निवडणूक प्रक्रिया अधिवेशन काळातच होते. तेव्हा विधानसभा अध्यक्षपद कुणाकडे राहणार याचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते मिळून घेतील.असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. 

नाना पटोले यांनी काँग्रेसपासून (congress) राजकारणाची सुरुवात केली. पण पक्षातील अंतर्गत वादातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभेत गेले. 

मात्र ५ वर्षांच्या आतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांनी  पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ साली पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदावर त्यांची नेमणूक करण्यात आली.

(congress president nana patole resign from maharashtra vidhan sabha president post)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा