Advertisement

विधानसभा अध्यक्षपद कुणाकडे जाणार?, शरद पवार म्हणाले...

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झालं आहे. यामुळे हे पद काँग्रेसकडेच राहणार की शिवसेना अथवा राष्ट्रवादीकडे जाणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहे.

विधानसभा अध्यक्षपद कुणाकडे जाणार?, शरद पवार म्हणाले...
SHARES

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झालं आहे. यामुळे हे पद काँग्रेसकडेच राहणार की शिवसेना अथवा राष्ट्रवादीकडे जाणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या पदाबाबतचा निर्णय इतक्या सहजपणे सुटणार नसल्याचंच दिसून येत आहे.

नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यामुळे हे रिक्त झालेलं पद काँग्रेसकडेच (congress) राहणार की शिवसेना वा राष्ट्रवादी देखील या पदावर दावा सांगणार हे अद्याप अस्पष्टच आहे. 

राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांना जेव्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा, विधानसभा अध्यक्ष निवडण्याची निवडणूक प्रक्रिया अधिवेशन काळातच होते. तेव्हा विधानसभा अध्यक्षपद कुणाकडे राहणार याचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते मिळून घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 

हेही वाचा- महाराष्ट्र काँग्रेसची धुरा नाना पटोलेंच्या हाती, दिल्लीतून शिक्कामोर्तब

महाविकास आघाडी सरकारची जुळवाजुळव सुरू असताना निवडून आलेल्या जागांच्या संख्येनुसार शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये खात्यांचं वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे (ncp) तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्यात आलं. 

परंतु आता हे पद रिक्त झाल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तापदांची नवी समीकरणं तयार होतील असं म्हटलं जात आहे. शिवसेना (shiv sena) हे पद ताब्यात घेण्यास इच्छुक असून त्याबदल्यात काँग्रेसला दुसरं उपमुख्यमंत्रीपद तयार करून देण्यात येईल. राष्ट्रवादीचीही त्याला संमती असल्याची चर्चा रंगली आहे.

या सगळ्या गुंतागुंतीवर भाष्य करताना, पदाचा राजीनामा देण्याआधी नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला कल्पना दिली होती. पक्षात त्यांना नवी जबाबदारी मिळत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण विधानसभा अध्यक्षपद हे सरकारमधील तिन्ही पक्षांचं होतं. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे या पदाची व्हेकन्सी तयार झाली आहे. हे पद आता खुलं झालं आहे. या पदाबाबत आता पुन्हा चर्चा होईल, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. 

यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा प्रश्न सहज सुटणारा नसल्याचंही स्पष्ट झालं आहे.

(ncp chief sharad pawar reacts on maharashtra vidhan sabha president post)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा