Advertisement

आपलं क्षेत्र सोडून इतर विषयावर बोलताना काळजी घ्यावी, शरद पवारांचा सचिनला सल्ला

आपलं क्षेत्र सोडून इतर विषयावर बोलताना सचिनने काळजी घ्यावी, असा सल्ला पवार यांनी दिला.

आपलं क्षेत्र सोडून इतर विषयावर बोलताना काळजी घ्यावी, शरद पवारांचा सचिनला सल्ला
SHARES

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य करणारा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला सध्या ट्रोलर्सच्या तीव्र टीकेचा सामना करावा लागत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना विचारलं असता, आपलं क्षेत्र सोडून इतर विषयावर बोलताना सचिनने काळजी घ्यावी, असा सल्ला पवार यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय पाॅप सिंगर रिहानेने शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यावर देशभरात खळबळ माजली. यानंतर देशातील सेलिब्रिटींकडून सातत्याने आंदोलनाच्या बाजूने-विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. त्यातच सचिन तेंडुलकर ते लता मंगेशकर यांनी सरकारला अनुकूल ठरणारी भूमिका घेतल्यावर सोशल मीडियावरील ट्रोलर्स त्यांच्यावर तुटून पडले. 

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अजिबात मान्य नाही. बाह्यशक्ती फक्त पाहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहीत आहे आणि तेच भारताबद्दल ठरवतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असं टि्वट सचिन तेंडुलकरने केलं होतं. सचिन तेंडुलकरने हे टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही दिले होते.

हेही वाचा- अदानी पवारांच्या घरी येऊन गेल्यावर… राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

यावर प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रियेवर अनेक सामान्य लोकं तीव्रपणे व्यक्त होत आहेत. त्यामुळे आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील, असं शरद पवार म्हणाले.

सोबतच, शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी पुढं येण्याची गरज आहे. तर शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चा करावी. स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नव्हतं. सरकारने टोकाची भूमिका घेतल्यामुळे परिस्थिती अवघड झाली आहे. अन्नदाता रस्त्यावर बसत असेल, तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरून शेतकऱ्यांना सहानुभूती मिळत आहे, हे खरं तर चांगलं नाही. शेतकऱ्यांना कधी खलिस्तानी म्हणतात कधी अतिरेकी म्हणतात. शेतकरी आंदोलनाला बदनाम केलं जात आहे, हे बरोबर नाही, असंही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, सरकारने भारतरत्नांना अशाप्रकारे ट्विट करायला सांगणं चुकीचं आहे. फक्त एखाद्या सरकारी धोरणासाठी भारत सरकारने भारतरत्नांची प्रतिष्ठा पणाला लावू नये. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही साधी माणसं आहेत. आपल्या भारत सरकारने सांगितलं म्हणून त्यांनी ट्विट केलं पण आज सर्व रोषाला त्यांनाच सामोरं जावं लागतंय. असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी व्यक्त केलं.

(sharad pawar suggested sachin tendulkar to do not involved in political issue)

हेही वाचा- सत्तेत असताना औरंगाबादचं नामांतर का नाही? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा