Advertisement

सत्तेत असताना औरंगाबादचं नामांतर का नाही? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना या दोन्ही पक्षांना औरंगाबादचं नामांतर का करता आलं नाही? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेला विचारला आहे.

सत्तेत असताना औरंगाबादचं नामांतर का नाही? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न
SHARES

औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भीतीमुळे शिवसेना नामांतर करत नसल्याची टीका सातत्याने भाजपकडून होत आहे. त्यावर बोलताना केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना या दोन्ही पक्षांना औरंगाबादचं नामांतर का करता आलं नाही? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेला विचारला आहे.

शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांना औरंगाबादच्या नामांतरावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, दोन्ही पक्षांना म्हणजेच भाजप-शिवसेनेला औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आल्यावरच नामांतराचा विषय आठवला आहे. एकमेकांना शह-काटशह देण्यासाठीच हा विषय काढला जात आहे.

हेही वाचा- अदानी पवारांच्या घरी येऊन गेल्यावर… राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

भाजप आणि शिवसेनेची ज्यावेळेस केंद्रात-राज्यात सत्ता होती, तेव्हाच 'संभाजीनगर' हे नामांतर का नाही झालं? देशातल्या अनेक शहरांची, दिल्लीतल्या रस्त्यांची नावं बदलली गेली. पण औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं ? याचं उत्तर भाजप-शिवसेनेने द्यावं. आजही राज्य शिवसेना सत्तेत असून केंद्रात भाजपचं सरकार आहे, तेव्हा यात फार अडचण नसावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील हीच भूमिका आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालतं. सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असं थोरात म्हणाले होते.

(mns chief raj thackeray blames bjp and shiv sena for aurangabad name change issue)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

आजच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स किती धावांचा डोंगर रचेल, असे वाटते ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा