Advertisement

साधं ट्विटरवर संभाजीनगर म्हणू शकत नाही, हे नामांतर काय करणार?

काँग्रेसने डोळे वटारताच संभाजी नगरचा उल्लेख करणाऱ्याला समज देण्याची भाषा. हे नामांतर काय करणार? अशा शब्दांत भाजपने नामांतराच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे.

साधं ट्विटरवर संभाजीनगर म्हणू शकत नाही, हे नामांतर काय करणार?
SHARES

काँग्रेसने डोळे वटारताच संभाजी नगरचा उल्लेख करणाऱ्याला समज देण्याची भाषा. हे नामांतर काय करणार? अशा शब्दांत भाजपने नामांतराच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना टोला हाणला आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते केवश उपाध्ये यांनी याबाबत ट्विट करताना म्हटलं आहे की, काँग्रेसने  ठणकावलं की लगेच शिवसेनेचा साष्टांग. साधं ट्विटरवर संभाजीनगर म्हणू शकत नाही, काँग्रेसने डोळे वटारताच संभाजी नगरचा उल्लेख करणाऱ्याला समज देण्याची भाषा. हे नामांतर काय करणार?

विकासाच्या मुद्द्यांवर शिवसेनेला (shiv sena) सांगण्यासारख काहीच नाही, म्हणून भावनिक मुद्दे. आता नामांतराचा प्रस्ताव थेट कॅबिनेटमध्ये आणून उत्तर देणार? का ठणकावलं की सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार? असा प्रश्न देखील केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा- तर उद्या ‘या’ शहरांच्या नामांतराचीही मागणी होईल- अजित पवार

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याने काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचं परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचं भान बाळगावं. शहरांचे नामांतरण करणं हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असं बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) म्हणाले.

त्यानंतर सीएमओचं ट्विटर हँडल हाताळणाऱ्या व्यक्तीकडून चुकून औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असं टाईप झालं असावं. त्यामुळे संबंधित व्यक्तीला समज देण्यात येईल, असा खुलासा सरकारकडून देण्यात आला. यावरून आता भाजपकडून शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे.

(bjp spokesperson keshav upadhye slams shiv sena chief uddhav thackeray over cmo tweet)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा