Advertisement

आधी स्वत:चा पक्ष सांभाळा, आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला टोला

भारतीय जनता पक्षाला कोणाचा परिवार फोडण्यात इच्छा नाही आणि सरकार पाडण्यातही रस नाही, असं म्हणत भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून राष्ट्रवादीला टोमणा हाणला आहे.

आधी स्वत:चा पक्ष सांभाळा, आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला टोला
SHARES

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अफवा पसरवण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात संवाद साधण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्षाला कोणाचा परिवार फोडण्यात इच्छा नाही आणि सरकार पाडण्यातही रस नाही, असं म्हणत भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून राष्ट्रवादीला टोमणा हाणला आहे. (bjp mla ashish shelar slams ncp over internal disputes in party)

राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु या चर्चांमध्ये कुठलंही तथ्य नसून भाजपात गेलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आमदार भाजपमधून पुन्हा घरवापसीसाठी प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.

त्यावर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला स्वत:च्या घरातला विसंवाद आणि स्वत:च्या घरातला भेद लपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून काही आमदार येतील का? अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम राष्ट्रवादीकडून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने चाललं आहे. मात्र याला भाजपच्या गोटातून कुठलीही सफलता मिळण्याची शक्यता नाही. 

हेही वाचा - सरकारचे सगळे पूल मजबूत- संजय राऊत

स्वत:चा पक्ष वाचवण्यासाठी होणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्याला माध्यमं देखील का प्रसिद्धी देत आहेत? याचं आम्हाला आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात संवाद जरी साधला तरी खूप होईल, अशी स्थिती आहे. अन्य पक्षातील आमदारांच्या बाबतीतली चिंता तुम्ही करू नका. स्वत:चं सरकार आणि स्वत:चा पक्ष वाचवण्याची भूमिका तुम्ही घ्या. भारतीय जनता पक्षाला कोणाचा परिवार फोडण्यात इच्छा नाही आणि सरकार पाडण्यातही रस नाही, असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही. हे सरकार पूर्ण ५ वर्षे टिकणार आहे. पूल बिहारमध्ये पडलेत. आधीच्या सरकारने बांधलेले पूल पडले आहेत. विरोधकांनी आम्हाला कोणतेही सल्ले देऊ नयेत. उद्धव ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार ५ वर्षे चालणार यात आमच्या कोणाच्याही मनात काही शंका नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - ‘नया है वह’, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली पार्थची पाठराखण

संबंधित विषय
Advertisement