Advertisement

‘नया है वह’, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली पार्थची पाठराखण

राष्ट्रवादीचे नेते आणि नागरी व अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ‘नया है वह’ म्हणत पार्थ यांची पाठराखण केली आहे.

‘नया है वह’, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली पार्थची पाठराखण
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारे पार्थ पवार अपरिपक्व असून, त्यांच्या वक्तव्याला आपण कवडीची किंमत देत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना बुधवारी फटकारलं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि नागरी व अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ‘नया है वह’ म्हणत पार्थ यांची पाठराखण केली आहे. (ncp leader chhagan bhujbal backs parth pawar)

शरद पवार यांनी या विषयावर मत प्रदर्शन केल्यावर पुन्हा मी त्यावर काही बोलण्याची, सांगण्याची गरज नाही. शरद पवारांनी ते थोडे अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. हिंदीत सांगायचं झालं तर नया है वह, एवढंच आहे. आम्हीसुद्धा पवार कुटुंबाचे सदस्य आहोत. शरद पवार यांच्या वक्तव्याने अजित पवार किंवा इतर कोणीही दुखावलं गेलेलं नाही. आम्ही सगळे एकत्रित आहोत. कुटुंबातील सदस्यांना बोलण्याचं, सुचवण्याचं, समजावण्याचं काम वरिष्ठ माणसं करतच असतात, त्यानुसारच शरद पवार बोलले, असं छगन भुजबळ म्हणाले.

हेही वाचा - नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, शरद पवारांनी पार्थला फटकारलं

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारं निवेदन गृहमंत्र्यांना दिलं. आपल्याला देशभरातून तरुणांचे फोन येत आहेत. खासकरून यूपी, बिहारमधून अधिक फोन येत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी तरुणांची भावना असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं होतं.  

त्यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, पार्थचा अनुभव कमी आहे. तो प्रगल्भ नाही. त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही कुणाला सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असं वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा