Advertisement

शिव वडापाव, शिव थाळीनंतर येत आहेत शिव दवाखाने, भाजपची टीका

शिव वडापाव, शिव थाळीनंतर येत आहेत शिव दवाखाने, असं ट्विट करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

शिव वडापाव, शिव थाळीनंतर येत आहेत शिव दवाखाने, भाजपची टीका
SHARES

मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं, असं म्हणत डाॅक्टरांची नाराजी ओढावून घेणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपने खोचक शब्दांत टीका केली आहे. शिव वडापाव, शिव थाळीनंतर येत आहेत शिव दवाखाने, असं ट्विट करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. (bjp mla atul bhatkhalkar criticised shiv sena mp sanjay raut)

शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशा नंतर आता येत आहेत शिव दवाखाने...

 इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील, असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील निवासी डाॅक्टरांची संघटना असलेल्या मार्डने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं. या पत्रात एकीकडे आपणच बाेलायचे की डाॅक्टर्स कोरोना योद्धा आहेत आणि दुसरीकडे आपल्याच सहकाऱ्यांनी अशी वल्गना करावी, याचा आम्ही तरूण डाॅक्टरांनी काय अर्थ घ्यायचा? गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही दिवस-रात्र जीवाची बाजी लावून काम करत आहोत. आमच्यापैकी अनेकांनी आपल्या घरादाराचे, मायबापाचे तोंड कित्येक दिवस झाले बघितलेलं नाही. अनेकजण मृत्यूच्या दाढेतून परत आली आहेत, ‘डाॅक्टरांना काय कळतंय’ हे ऐकण्यासाठीच का? असा प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा - डाॅक्टरांना काय कळतं.. तुम्हाला देखील हेच वाटतं का?, मार्डचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

खासदार साहेबांनी जे भाष्य केलं आहे ते राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तरूण डाॅक्टरांचं खच्चीकरण करणारं असून आपलीसुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे का? जर असं नसेल, तर खासदारसाहेबांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करून आपलं वक्तव्य मागे घ्यावं. तसं होत नसेल, तर आपलीही हीच अधिकृत भूमिका समजून तरूण डाॅक्टर याचा निषेध रस्त्यावर उतरतील, असा इशाराही मार्डने दिला.

तर दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी डाॅक्टरांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा