Advertisement

डाॅक्टर तर देवदूतासारखे- संजय राऊत

कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा, असं संजय राऊत म्हणाले.

डाॅक्टर तर देवदूतासारखे- संजय राऊत
SHARES

कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी डाॅक्टरांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. (shiv sena mp sanjay raut clarifies over doctors comment)

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? इकडून तिकडून गोळा केलेले लोक तिथं आहेत. मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं, असं विधान केलं होतं. या व्यक्तव्याविरोधात नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी डाॅक्टरांकडून होऊ लागली आहे. 

त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून इतकं टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. 

हेही वाचा - मग, संजय राऊत बोलत असल्यानेच संशय वाढलाय- नारायण राणे

जागतिक आरोग्य संघटना ही राजकीय संघटना झाली आहे. हे माझंच नाही तर अनेक देशांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी अमेरिकेकडून डब्ल्यूएचओला होणार निधी पुरवठा थांबवला आहे. कोरोनाचा फैलाव होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जबाबदार असल्याचं अनेक देशांनी म्हटलं आहे. रशियानेसुद्धा जागतिक आरोग्य संघटनेविरोधात विधानं केली आहेत. पुतीन यांनी जागतिक आरोग्य संघटनेला न विचारता लस बाजारात आणली म्हणून तेथील डॉक्टर आंदोलन करत आहेत का ? आज प्रत्येक देश आणि राज्य आपापली परिस्थिती हाताळत आहे. मग तुम्ही ट्रम्प आणि रशियाचाही निषेध करणार का ? असा उलट प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.

कोरोनाच्या काळात शिवसैनिकांनी डॉक्टरांविरोधात जेव्हा जेव्हा आंदोलन केलं. तेव्हा त्यांची मी समजूत काढली. अनेकदा मी डॉक्टरांच्या बाजूने उभं राहिलो आहे. मार्डच्या अनेक संप आणि मागण्यांबाबत मी भक्कमपणे बाजू मांडली आहे. काही विशिष्ट पक्षांची लोक डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. माझीही ती भावनाही नव्हती. अपमान आणि कोट्यांमधला फरक समजून घेतला पाहिजे, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

हेही वाचा - भाजप आमदाराने पाठवली संजय राऊतांना नोटीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा