Advertisement

“‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम फोल; ‘त्यांच्या’ कुटुंबातील व्यक्तींनाच कोरोना”

"माझं कुटुंब माझी जबाबदारी" ही ठाकरेसाहेबांची मोहीम अतिशय फोल ठरली आहे. त्यांच्या कुटुंबातील सगळ्याच व्यक्तींना कोरोना झालाय.

“‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम फोल; ‘त्यांच्या’ कुटुंबातील व्यक्तींनाच कोरोना”
SHARES

"माझं कुटुंब माझी जबाबदारी" ही ठाकरेसाहेबांची मोहीम अतिशय फोल ठरली आहे. त्यांच्या कुटुंबातील सगळ्याच व्यक्तींना कोरोना झालाय. राज्यात कोरोना कमी होण्याऐवजी वाढला. कारण, त्यांचं धोरणचं चुकीचं होतं, अशा घणाघाती शब्दांत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर प्रहार केला. 

खासदार नारायण राणे यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे यांनी सरकारचं कोरोनाबाबतच चुकीचं धोरण आणि सचिन वाझे प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. 

ते म्हणाले, महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री परत लाॅकडाऊन करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांचे मित्रपक्ष मात्र लाॅकडाऊन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांइतके उतावीळ झालेले दिसत नाहीत. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मुख्यमंत्री "माझं कुटुंब माझी जबाबदारी" अशी एक घोषणा देत होते. मात्र ही जबाबदार पार पाडण्यात तेच कमी पडल्याने त्यांच्या घरातले सगळेच कोरोनाग्रस्त झाले आहेत. "माझी जबाबदारी" काही त्यांना पेलवलेली नाही. त्यामुळे राज्यातील कोरोना कमी होण्याऐवजी वाढला कारण, त्यांचं धोरणचं चुकीचं होतं.

हेही वाचा- घरात दोन कोरोना पाॅझिटिव्ह असताना मुख्यमंत्री बाहेर कसे? खुलासा करा...

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पैसे नाहीत, बेडला पैसे नाहीत, अधिकारी मिळत नाहीत, डाॅक्टर मिळत नाहीत. मग फक्त पैसे खायला आहात का तुम्ही? कोरोनामुक्त महाराष्ट्र करायला तुमच्याकडे पैसे नाहीत. तर सरकारचे पैसे जातात कुठे? कोरोनाच्या (coronavirus) नावाखाली जिल्ह्याजिल्ह्यात भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकाऱ्यांना पैसे जमवण्याचं काम दिल्याने ते देखील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना जुमानत नाहीत, असा आरोप नारायण राणेंनी केला.

सचिन वाझे प्रकरणावर भाष्य करताना ते म्हणाले, सचिन वाझे नक्की कोणासाठी काम करत होता? जनतेसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी की मुख्यमंत्र्यांच्या वसुलीसाठी? मध्यमवर्गीयांना साधं एक घर घेणं जिथे मुश्किल आहे, तिथं वाझेचे कुलाब्यापासून महाराष्ट्रभर फ्लॅट आहेत. विविध गुन्ह्यात अडकून निलंबित झालेल्या वाझेला पुन्हा खात्यात घेण्याचं काम शिवसेनेनं (shiv sena) केलं. त्याला पूर्ण पाठिंबा शिवसेनेने दिला.

वाझेला बोलवून सांगण्यात आलं शंभर कोटी रुपये दे म्हणून. मग वाझे काय दहा गाड्या घेईल किंवा २५ गाड्या घेईल. हवे त्यांचे खून पाडेल. त्याला माहितेय की मी पैसे नेऊन देतो, मला वाचवणारच. पण एनआयएच्या चौकशीत सगळं सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा नारायण राणे यांनी व्यक्त केली.

(bjp mp narayan rane slams cm uddhav thackeray for increasing covid 19 in maharashtra)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा