Advertisement

... तर लोकल ट्रेन, माॅल, थिएटर बंद करू, महापौर किशोरी पेडणेकरांनी दिला इशारा

महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचं म्हटलं आहे. गर्दी कमी करण्यासाठी कडक निर्बंध लावण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

... तर लोकल ट्रेन, माॅल, थिएटर बंद करू, महापौर किशोरी पेडणेकरांनी दिला इशारा
(File Image)
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आता हाताबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईत कडक निर्बंध लागू करण्याची तसंच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचं म्हटलं आहे. गर्दी कमी करण्यासाठी कडक निर्बंध लावण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, लोक नियम न पाळता फिरणार असतील तर कडक निर्बंध गरजेचे आहेत. त्या दिशेने पावलं चालली आहेत. लॉकडाउन राज्य सरकारलाही नको आहे, तुम्हा आम्हाला कोणालाच नको आहे. पण वाढणारी रुग्णसंख्या, आरोग्य यंत्रणेवरील बोजा कमी करायचा असेल तर नियम पाळायलाच हवे. लोकांनी घाबरु नये, पण स्वत:ला सांभाळा आणि नियम पाळा. दैनंदिन व्यवहार चाललेच पाहिजेत, पण त्याचा अर्थ कसंही वागा आणि रुग्णसंख्या वाढावी असं होत नाही.

मुंबईत कडक निर्बंध लावले जाणार असून त्यानुसार हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थितीची कडक अंमलबजावणी केली जाईल. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वयोवृद्ध आणि लहान मुले मोठ्या संख्येने जातात. त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे बंद केली जातील. थिएटर, मॉल बंद केले जातील.

 ट्रेनमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सामान्य प्रवाशांना ट्रेनमधील प्रवास बंद करून अत्यावश्यक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. कार्यालयांमध्ये दोन शिफ्ट करण्यावर आणि ५० टक्के उपस्थितीवर भर दिला जाईल. दुकाने एक दिवस सोडून उघडली जातील, असंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा -

मुंबईत मार्चमध्ये कोरोना रुग्ण संख्येत ४७५ टक्के वाढ

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा