Advertisement

‘शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे’, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका

'शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे', अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंवर ट्विटरवरून टीका केली आहे.

‘शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे’, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका
SHARES

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्वपक्षीय नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. अशातच,  भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. 'शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे', अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंवर ट्विटरवरून टीका केली आहे. त्याशिवाय, मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी पक्षाला रामराम केल्यावरुनही टीका केली आहे. 


ट्विटरवरून टीका

'सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी “फक्त लढ” असे म्‍हटले.!! “शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे”, अशा शब्दांत ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. 


'बारामतीचे पोपट'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण केलं होतं. त्यावेळी 'राज ठाकरेंची स्क्रिप्ट बारामतीहून येते', अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसंच, राज ठाकरे 'बारामतीचे पोपट' आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी 'टीका मी केली आणि हे आम्हाला पोपट म्हणतात, देवेंद्र फडणवीस हे म्हणजे हवा गेलेला फुगा आहे. फुगलेल्या फुग्याला जसा कोणताही आकार दिला जातो तशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची आहे' अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.



हेही वाचा -

मनोमिलनानंतरही उद्धव, फडणवीस करणार वेगवेगळा प्रचार

एअर इंडियाच्या मुंबईतील ३ घरांची अखेर विक्री



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा