Advertisement

३८ वर्षांची झाली भाजपा, बीकेसीत जाेरदार शक्तीप्रदर्शन


३८ वर्षांची झाली भाजपा, बीकेसीत जाेरदार शक्तीप्रदर्शन
SHARES

भाजपाच्या ३८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शुक्रवारी वांद्रे-कुर्ला संकुला (बीकेसी) तील एमएमआरडीए मैदानात भव्य महामेळाव्याला संबोधीत करणार आहेत. या महामेळाव्यासाठी एक दिवस आधीच राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबई येऊन दाखल झाले आहेत. अमित शहा देखील गुरूवारी रात्रीच मुंबईत दाखल झाले आहेत. या महामेळाव्याच्या निमित्ताने येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे.


१२ वाजता शहा यांचं भाषण

मुंबई भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा दुपारी १२ वाजता या मेळाव्यात भाषण करतील. या मेळाव्यात किमान ३ लाख भाजपा कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री आणि केंद्रातील मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या समावेश तर असणारच आहे. या मेळाव्याला सकाळी ११ वाजता सुरूवात होईल.


आमदारांसोबत बैठक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा महामेळावा संपल्यानंतर राज्यातील आमदारांसोबत बैठक देखील घेऊ शकतात. या बैठकीत येणाऱ्या निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा होणं अपेक्षित आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा