Advertisement

भाजपकडून १,८०० कोकण गाव प्रमुखांची नियुक्ती


भाजपकडून १,८०० कोकण गाव प्रमुखांची नियुक्ती
SHARES

कोकणनगर - कोकणी मतांवर डोळा ठेवून भाजपनं सुरू केलेल्या कोकण गाव प्रमुख संकल्पनेतून सुमारे १,८०० गाव प्रमुखांची नोंदणी करण्यात आली आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास साडेतीन हजार गावे असून प्रत्येक गावातील मुंबईत असलेल्या चाकरमान्यांची ग्रावप्रमुख म्हणून भाजपच्या कोकण विकास आघाडीकडून नोंदणी करण्यात येत आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणी वस्ती असलेल्या भांडुपच्या कोकणनगरात रविवारी एका मेळाव्याचे आयोजन करून ही संकल्पना मांडण्यात आली. या वेळी उपस्थित असलेल्या भाजपमधील बड्या नेत्यांनी कोकणचा विकास कशा पद्धतीने करु शकतो याबद्दल माहिती दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement