Advertisement

भाजपकडून ऐनवेळी रमेश कराड यांना उमेदवारी, होणार बिनविरोध आमदार

भाजपकडून ४ उमेदवारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतरही ऐनवेळी डाॅ. अजित गोपछडे (bjp ajit gopchade) यांचा पत्ता कट करून रमेश कराड (ramesh karad) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडून ऐनवेळी रमेश कराड यांना उमेदवारी, होणार बिनविरोध आमदार
SHARES

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक (vidhan parishad election) बिनविरोध होणार हे जवळपास ठरलेलं असताना देखील या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपकडून ४ उमेदवारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतरही ऐनवेळी डाॅ. अजित गोपछडे (bjp ajit gopchade) यांचा पत्ता कट करून रमेश कराड (ramesh karad) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडून उमेदवारी

गेल्याच आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रविण दटके आणि डॉ. अजित गोपछडे या ४ उमेदवारांनी भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे हे ४ अधिकृत उमेदवार असतील हे स्पष्ट झालं होतं.

हेही वाचा - खडसे, मुडेंना पुन्हा डावललं, भाजपने केली विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा

नाराजी दूर

त्यानंतर एखाद्या उमेदवाराचा अर्ज चुकीने बाद झाल्यास जोखीम नको म्हणून रमेश कराड यांनी भाजपकडून डमी उमेदवार म्हणून अर्ज केला हाेता. अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी कराड अर्ज मागे घेतील, असं म्हटलं जात होतं. परंतु प्रत्यक्षात डाॅ. अजित गोपछडे यांनी अर्ज मागे घेतल्याने आर्श्चय व्यक्त केलं जात आहे. पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने नाराज वंजारी समाजाला खूष करण्यासाठी कराड यांना उमेदवारी देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 

विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघात कराड यांची चांगली पकड असूनही हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा लागल्याने कराड नाराज होते. या निमित्ताने त्यांचीही नाराजी दूर झाली आहे. 

अर्ज मागे

२१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १४ मे २०२० आहे. दरम्यान अपक्ष उमेदवार  शेहबाज राठोड यांचा अर्ज छाननीत अर्ज बाद झाला असून भाजपचे संदीप लेले आणि अजित गोपचडे, तसंच राष्ट्रवादीचे किरण पावसकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. 

बिनविरोध निवड

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी ९ वैध अर्जच शिल्लक राहिल्याने शिवसेनेचे उमेदवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, तसंच काँग्रेसचे राजेश राठोड यांच्यासोबत रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रविण दटके आणि रमेश कराड यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा