Advertisement

रामदास आठवले चक्क भाजपवर नाराज, 'हे' आहे त्यामागचं कारण, वाचा...

वेळ प्रसंग याची कुठलीही तमा न बाळगता नेहमी भाजपचं कौतुक करणारे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले चक्क भाजपवर नाराज आहे.

रामदास आठवले चक्क भाजपवर नाराज, 'हे' आहे त्यामागचं कारण, वाचा...
SHARES

वेळ प्रसंग याची कुठलीही तमा न बाळगता नेहमी भाजपचं कौतुक करणारे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले चक्क भाजपवर नाराज आहे. एवढंच नाही, तर त्यांनी आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त देखील केली आहे. 

कारण काय?

येत्या २१ मे २०२० रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने रिपाइंच्या एका उमेदवाराला उमेदवारी द्यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली होती. त्यासाठी ते काही दिवसांपासून प्रयत्नशील देखील होते. त्यातच भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या ४ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. 

हेही वाचा - विधान परिषदेसाठी माझं नाव चर्चेत, पण..- शशिकांत शिंदे

उमेदवारीची मागणी

भाजपने भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या ४ जणांना संधी दिली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज देखील दाखल केले. या ४ जागांपैकी एकाही जागेवर उमेदवारी न मिळाल्याने आठवले नाराज झाले आहेत.

त्यानंतर रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील १ जागा भाजप ने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी रिपाइंची मागणी होती. मित्रपक्ष म्हणून भाजप च्या वाट्याला येणाऱ्या ४ जागांपैकी १ जागा रिपाइंला न सोडल्याने रिपाइं कार्यकर्ते नाराज आहेत, असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

 कधी आहे निवडणूक?

२१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विधान परिषदेत रिक्त झालेल्या ९ जागांपैकी भाजपच्या ३, राष्ट्रवादी ३, काँग्रेस २ आणि शिवसेना १ अशा जागेचा समावेश आहे. विधानसभेत निवडून आलेले २८८ आमदार या ९ जागांसाठी मतदान करतील. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ मे आहे. २४ एप्रिल रोजी होणारी ही निवडणूक कोरोना संकटामुळे पुढं ढकलण्यात आली होती.

हेही वाचा - खडसे, मुडेंना पुन्हा डावललं, भाजपने केली विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा