Advertisement

उर्मिला यांच्या प्रचार रॅलीदरम्यान पुन्हा मोदींच्या घोषणा

मालाड येथे मंगळवारी उर्मिला मातोंडकर यांची प्रचार रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी या रॅलीदरम्यान काहींनी ‘मोदी...मोदी’ अशा घोषणा दिल्या. मात्र, ऊर्मिला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केल्याचं समजतं आहे.

उर्मिला यांच्या प्रचार रॅलीदरम्यान पुन्हा मोदींच्या घोषणा
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सोमवारी बोरीवली स्थानकाबाहेर काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांची प्रचार रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी रॅलीदरम्यान काही तरुणांनी मोदी यांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या. याप्रकरणी उर्मिला यांनी तक्रार केली असून पोलिस संरक्षणाची मागणी केली. मात्र, असं असाताना पुन्हा एकदा उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीदरम्यान काहींनी मोदींच्या नावाच्या घोषणा केल्याचं समोर येत आहे. 


पुन्हा ‘मोदी...मोदी’

मालाड येथे मंगळवारी उर्मिला मातोंडकर यांची प्रचार रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी या रॅलीदरम्यान काहींनी ‘मोदी...मोदी’ अशा घोषणा दिल्या. मात्र, उर्मिला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत आहे. 


चुरशीची  लढत

उर्मिला आणि गोपाळ शेट्टी यांच्यातील लढत दिवसेंदिवस चुरशीची होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मंगळवारी मालाड मार्केट येथे उर्मिला यांची रॅली दाखल झाली. त्यावेळी रॅलीलगत भाजप समर्थकांनी ‘मोदी...मोदी...’ अशा घोषणा देत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.हेही वाचा -

Tik Tok अॅप डिलिट करा, केंद्राचे गुगलला आदेश

TYBCOM परिक्षेतील कॉपीप्रकरणी पोलीस करणार चौकशीसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा