'बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प नको'

 Churchgate
'बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प नको'

सीएसटी - मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याची मागणी समाजवादीतर्फे करण्यात आलीय. समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते रईस शेख यांनी ही मागणी महापौर स्नेहल आंबेकरांकडे केली आहे. बेस्टची परिवहन सेवा गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. परिणामी बेस्ट सेवा इतर परिवहन सेवेपेक्षा महाग होत चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबईकर बेस्टकडे वळण्याएेवजी रेल्वे, रिक्षा-टॅक्सी, मोनो, मेट्रोला प्राधान्य देत असल्याने बेस्ट प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. परिवहन सेवेला होणारा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन उपकराच्या माध्यमातून विद्युत ग्राहकांवर आर्थिक बोजा टाकला जात आहे. त्यामुळे बेस्टचा अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केलीय.

Loading Comments