Advertisement

मुंबईतील राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेस उच्च न्यायालयात

राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवर आयोजित करण्याची तयारी मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस करत आहे.

मुंबईतील राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेस उच्च न्यायालयात
फाईल फोटो
SHARES

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात सभा होणार होती. येत्या २८ डिसेंबरला ही सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतू, सभेला राज्य सरकारनं अद्याप  परवानगी दिलेली नाही. त्यामुळं राहुल गांधी यांची मुंबईत सभा होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवर आयोजित करण्याची तयारी मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस करत आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारनं सभेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळं सभेच्या परवानगीसाठी काँग्रेसनं उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सभेच्या निमित्तानं राहुल गांधी हे मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या राजवटीवरही ते शाब्दिक हल्ले करतील. राजस्थानमधील रॅलीनंतर मुंबईची सभा यशस्वी करण्याची तयारी पक्षाकडून केली जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा