चिमुरडीच्या मृत्यूला जबाबदार कोण?

 Kurar Pimpripada
चिमुरडीच्या मृत्यूला जबाबदार कोण?
चिमुरडीच्या मृत्यूला जबाबदार कोण?
See all

कुरार पिंपरीपाडा - शौचालयाच्या उघड्या टाकीत पडून मृत्यू पावलेल्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे प्रभाग क्र. 39 चे शाखाध्यक्ष विजय बोर यांनी केलीय. याबाबत त्यांनी कुरार पोलीस ठाणे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. याचबरोबर बेजबाबदारीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न केल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. शौचालयाची टाकी उघडी असल्यामुळे मंगळवारी 4 वर्षीय आस्था पाल या मुलीला त्यात पडून जीव गमवावा लागला होता. दरम्यान आमच्याकडे कुणी तक्रार करण्यास आलं नसल्याचं पोलीस निरीक्षक लिंबाना व्हनमाने यांनी सांगितल.

Loading Comments