एस विभागात येणार 'महिला राज'

  Bhandup
  एस विभागात येणार 'महिला राज'
  मुंबई  -  

  भांडुप - येत्या पालिका निवडणुकीनंतर एस विभागावर महिलांची सत्ता येणार आहे. सोमवारी जाहीर झालेल्या नव्या प्रभाग रचनेत या विभागातील प्रभागांची संख्या एकने वाढून 14 झाली आहे. तसेच यातील चार प्रभाग वगळता उरलेले दहा प्रभाग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.

  14 पैकी 10 प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने विभागात कार्यरत असलेल्या विद्यमान नगरसेवक रमेश कोरगावकर, सुरेश कोपरकर, रूपेश वायंगणकर, तावजी गोरूले धनंजय पिसाळ, मंगेश पवार आणि सेनेचे आमदार अशोक पाटील या दिग्गजांना धक्का बसला आहे.
  पालिकेच्या एस विभागामध्ये जुन्या नोंदणीप्रमाणे 104 ते 116 पर्यत एकूण 13 प्रभाग होते. नव्या रचनेनुसार त्यात एका प्रभागाची भर पडून हे प्रभाग आता 109 क्रमांकापासून ते 122 क्रमांकाने अोळखले जाणार असल्याची माहिती नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनी सांगितले.
  नवीन रचनेनुसार प्रभाग क्रमांक 114, 115, 118 आणि 122 हे चार प्रभाग सर्व साधारण (खुले) राहणार आहेत, तर 117, 119 महिला अोबीसी, 121 महिला एसटी यांसह राहिलेले सर्व प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.