Coronavirus cases in Maharashtra: 235Mumbai: 93Pune: 32Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Buldhana: 3Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

कोरोनाबाधित कनिका कपूरनं राष्ट्रपतींचा जीव धोक्यात टाकला का? नेटकऱ्यांचा संतप्त सवाल

कनिका कपूरनं दिलेल्या पार्टीत काही राजकीय नेते उपस्थित होते. त्यामुळे आता नेत्यांवरही कोरोनाचं सावट आहे.

कोरोनाबाधित कनिका कपूरनं राष्ट्रपतींचा जीव धोक्यात टाकला का? नेटकऱ्यांचा संतप्त सवाल
SHARE

बॉलिवूड गायिका कनिका कपूरची नुकतीच कोरोनाव्हायरससाठी टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भात माहिती दिली. तला सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. असं म्हटलं जातं की, कनिकानं आपल्या लंडनच्या प्रवासाबद्दल अधिकाऱ्यांना माहिती दिली नव्हती. त्यानंतर तिनं लखनऊला उड्डाण केलं. तिथं तिनं १०० हून अधिक पाहुण्यांना पार्टी दिली. या पार्टीत काही उच्च स्थरीय राजकारण्यांचा देखील सहभाग होता.


'या' नेत्या होत्या संपर्कात

कनिका पॉझिटिव्ह आल्याचं कळताच तिच्या संपर्कात आसलेल्यांनी ट्विटरवर माहिती देण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजपा नेत्या वसंधुरा राजे यांचं देखील नाव आहे. वसंधुरा राजे लखनऊच्या त्यापार्टीमध्ये गेल्या होत्या. 

वसुंधरा राजे यांनी ट्विटरवर केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, खनऊमध्ये असताना मी आणि माझा मुलगा दुष्यंत आम्ही रात्रीच्या जेवणाला हजर होतो. दुर्दैवानं # कोविड १९ साठी सकारात्मक चाचणी घेणारी कनिका देखील पाहुणी म्हणून उपस्थित होती. मुबलक सावधगिरीची बाब म्हणजे माझा मुलगा आणि मी ताबडतोब आयसोलेशनमध्ये गेलो आहेत. सर्व आवश्यक खबरदारी घेत आहोत."


भाजपा नेतेही पार्टीत हजर

कणिकानं ज्या पार्टीत हजेरी लावली त्या पार्टीत भाजपाचे खासदार दुष्यंत सिंग उपस्थित होते. दुष्यंत सिंग यांनी दुसऱ्या दिवशी संसदेत देखील उपस्थिती लावली. त्यानंतर ते भारताच्या राष्ट्रपतींना भेटले. तथापि, याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी प्राप्त झालेली नाही.

ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन अनेकांनी सरकारला संपूर्ण संसद आणि अध्यक्ष भवन इथल्या कर्मचार्‍यांना अलग ठेवण्याचं आवाहन केले आहे.


कनिकावर नेटकरी संतापले

पण तिनं ट्विटरवर ही बातमी जाहीर केल्यानंतर युजर्सनी तिच्यावर टीका केली आहे. तिच्या या कृत्याला 'निष्काळजीपणा' म्हणत तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. 

लेखक तुहिन शाह म्हणाला की, "मी श्री योगीयादित्यनाथ जी यांना विनवणी करतो की # कनिकाकपूर यांना अटक केली पाहिजे आणि महामारी अधिनियम, १८९७ च्या कलमा अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे" असं आवाहन केलं.

शिव अरोर म्हणाले, "विलंब न करता संसद बंद करण्याचा विचार करा." 

पत्रकार बरखा दत्त म्हणाली की, "काल मी संसद चालू ठेवण्याच्या शहाणपणावर प्रश्न विचारला.  होता. बाकी सर्व काही बंद करण्यात येत आहे. माझा संशय अगदी योग्य निघाला. कनिका कपूर पॉझिटिव्ह निघाली. खासदार दुष्यंत सिंग यांची तिनं भेट घेतली. ते संसदेत गेले. अशा प्रकारे तो पसरला"

यावर आणखी काही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली.
संबंधित विषय
ताज्या बातम्या