Advertisement

संघाचा इतिहास सांगणारे पुस्तक प्रकाशित


 संघाचा इतिहास सांगणारे पुस्तक प्रकाशित
SHARES

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासासावर आधारित 'विश्वातील अद्वितीय संघटन'- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या पुस्तकाचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते शनिवारी विलेपार्ले येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहात प्रकाशन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एस्सेल गृपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा, अनिरुद्ध बापू यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 

लेखक आणि संघाचे वरिष्ठ कार्यकर्ता रमेशभाई मेहेता यांनी या पुस्तकात संघाचा इतिहास तसेच संघाची स्थापना, विस्तार व अनेक महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहेत. आज आरएसएसची प्रतिमा चुकीची दाखवली जाते. त्यामुळे तरूण पिढीला संघ निट समजावा, या उद्देशाने हे पुस्तक लिहिल्याचे लेखक रमेशभाई मेहता यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाजवादी पक्षाची खिल्ली उडवत समाजवाद हा पूर्णपणे संपला आहे आणि समाजवादीची हालत तर "दिल के तुकडे हुए हजार कुछ यहा गिरे कुछ वहा" असं म्हणतं जोरदार टीकास्त्र सोडलं. यावेळी उपस्थितांनी संघाचे तोंडभरून कौतूक केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा