पाकिस्तानी कलाकारांचा हिंदू जनजागृती संघाकडून निषेध

दादर - मुंबईत होणा-या जिओ फिल्मफेअर पुरस्कारमध्ये पाकिस्तानी कलाकारांना नॉमिनेट करण्यात आले आहे. या विरोधात शुक्रवारी दादर कबुतरखाना इथे हिंदू जनजागृती समितीने निषेध केला.

अभिनेता फवाद खान, गायक राहत फतेअली खान, बलोच यांच्यासह चार कलाकारांना नॉमिनेट करण्यात आले आहे. भारतीय सैन्यांवर पाकिस्तानकडून सतत हल्ले होतात. या परिस्थितीत पाक कलाकारांना पुरस्कार देणे चुकीचे असल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी याचा निषेध केलाय. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भारतविरोधी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता कामा नये. त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. बॉलिवूड कलाकारांनी चित्रपटात राष्ट्रप्रेमाचा केवळ अभिनय न दाखवता पाकिस्तानी कलाकारांचे पुरस्कार रद्द करावेत, अशी मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे.

Loading Comments