शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्याच्या दौऱ्यावर (aditya thackeray ayodhya visit) जाणार आहे. त्यांच्या या दौऱ्याचं ब्रृजभूषण सिंह यांनी स्वागत केलं आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे 15 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. पण अयोध्येत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करणारे भाजपचे खासदार ब्रृजभूषण यांनी मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचे स्वागत केले आहे.
“माझा विरोध हा एका व्यक्तीला आहे. उत्तर भारतीय लोकांसोबत राज ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी चांगला व्यवहार केला नाही. त्यांना चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे, महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला आमचा विरोध नाही. आदित्य ठाकरे येत आहे, त्यांचं स्वागत आहे,” असं ब्रृजभूषण सिंह म्हणाले.
'आदित्य ठाकरे ज्या दिवशी अयोध्यात येत आहे, त्यादिवशी मी देशाच्या बाहेर आहे. त्यांना भेटायला आवडेल. पण मी आधीच दौरा निश्चित केला आहे. त्यामुळे भेटू शकणार नाही. आमचा विरोध फक्त हा राज ठाकरे यांना आहे, असंही सिंह यांनी सांगितलं.
तसंच, आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांचे पुतणे जरी असले तरी ठाकरे कुटुंबाने आणि शिवसेनेनं कधीही उत्तर भारतीयांसोबत चुकीचा व्यवहार केला नाही. पण, मनसे आणि राज ठाकरे यांनी सर्व देशासमोर उत्तर भारतीयांना अपमानित केले आहे. अयोध्या ही सर्वांची आहे, हिंदूंची आहे, मराठा समाजाची आहे. सर्वांनी यावं, आदित्य ठाकरेंनी यावं, उद्धव ठाकरे यांनीही किंवा कुणीही यावं त्यांचं स्वागत आहे, असंही ब्रृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा