Advertisement

नारायण राणे यांना केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे.

नारायण राणे यांना केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा
SHARES

महाविकास आघाडी सरकारने भाजपचे नेते नारायण राणे यांची सुरक्षा काढून घेतली होती. मात्र, आता नारायण राणे यांना केंद्र सरकारने Y दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. 

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. खासदार नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा यावेळी काढून घेतली होती.

नारायण राणे यांना आता केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने ही सुरक्षा दिली आहे. नारायण राणे यांच्या ताफ्यात १२ सीआयएस एफचे जवान तैनात असणार आहे. आगामी काळात भाजपच्या इतरही नेत्यांना सुरक्षा देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

Y दर्जाची सुरक्षा ही तिसऱ्या क्रमांकाची ही सुरक्षा व्यवस्था आहे. महत्त्वाचे असणारे मात्र तुलनेने कमी धोका असेलेल्या व्यक्तींना वाय श्रेणीची सुरक्षा दिली जाते. या व्यवस्थेत एकूण १२ सुरक्षा रक्षक असतात. ज्यामध्ये दोन प्रशिक्षित जवान असतात.



हेही वाचा -

आस्थापना पाठोपाठ सोसायट्यांना सीसीटीव्ही बंधनकारक

जे.जे. रुग्णालयात दिवसभरात १०० पैकी केवळ १३ जण लसीकरणास हजर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा