शिवसेना टक्केवारीवर जगते - गडकरी

  Mumbai
  शिवसेना टक्केवारीवर जगते - गडकरी
  मुंबई  -  

  मुंबई - शिवसेना टक्केवारीवर जगत असल्याचा आरोप केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. पालिकेची सत्ता 20 वर्ष शिवसेनेकडे आहे. काहीही व्हिजन नाही, काय फायदा अशा सत्तेचा? असा सवाल उपस्थित करत गडकरी यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले. शिवसेनेच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगावे की 20 वर्ष भ्रष्टाचार झाला नाही. या नेत्यांची शपथ घेण्याची हिंमत होणार नाही. मजबूत रस्ते बनविल्यावर नगरसेवक, अधिकारी, पक्ष प्रमुख नाराज होतात, त्यांना लक्ष्मी दर्शन कसे मिळणार ? बंगळुरू, चेन्नई, दिल्ली शहरांचे मंत्री, महापौर येऊन मला भेटतात. अतिरिक्त पैसा शहरासाठी मागतात. मात्र मुंबईच्या महापौरांनी कधीच माझी भेट घेतली नाही असं देखील गडकरी यावेळी म्हणालेत.

  नागपूरमध्ये भ्रष्ट्राचार चालत नाही. मी आव्हान करतो की नागपूर महापालिकेत भ्रष्ट्राचार दाखवावा मी राजकारणातून संन्यास घेईन. मी कंत्राटदारांना भेटत नाही, असंही गडकरी यावेळी म्हणाले. त्यातच करोडो पैशांचा चुराडा करुनही नालेसफाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी शिवसेनेवर केला. दरम्यान रे रोड येथे झालेल्या सभेत देखील नितीन गडकरी यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. मी शिवसेनेला आव्हान करतो शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोला वीस वर्षांत मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा पारदर्शी होता? मुंबईत महानगरपालिकेत एक ही भ्रष्टाचार झाला नाही हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोला असं सांगत पारदर्शकतेच्या मुद्द्याला गडकरींनी हात घातला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.