मुंबई गारठली...

 Mumbai
मुंबई गारठली...

मुंबई - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वातावरण चांगलंच तापलं आहे. पण, मुंबईच्या तापमानात बऱ्यापैकी घसरण झाल्याने वातावरणात मात्र गारवा आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जवळपास 21 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. गेल्या काही दिवसात उत्तरमध्ये झालेल्या हिमपातामुळे मुंबईत गारवा असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. तसंच हा वातावरणातला हा गारवा आणखी काही दिवस अनुभवता येणार असल्याचं ही हवामान खात्याचे संचालक डॉ.कृष्णकांत होसालीकर यांनी सांगितलं. तर, या वातावरणात उबदार कपडे, गरम जेवण, वृद्धांनी काळजी घ्यावी असं आवाहन कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजश्री काटके यांनी केलं आहे.

 

 

Loading Comments