Advertisement

छगन भुजबळांना आता सिडकोकडूनही दणका

गेल्या दोन वर्षांपेक्षाही अधिक काळ तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आता सिडकोनंही दणका दिला आहे. सानपाडा इथं महाविद्यालयाच्या बांधकामासाठी कवडीमोल किंमतीत भूखंड पदरात पाडून त्यावर गेल्या १५ वर्षात एकही वीट न रचल्यामुळं सिडकोनं हा भूखंड परत करण्याचे आदेश भुजबळांना दिले आहेत.

छगन भुजबळांना आता सिडकोकडूनही दणका
SHARES

अार्थिक गैरव्यवहार अाणि महाराष्ट्र सदन बांधकामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षांपेक्षाही अधिक काळ तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आता सिडकोनंही दणका दिला आहे. सानपाडा इथं महाविद्यालयाच्या बांधकामासाठी कवडीमोल किंमतीत भूखंड पदरात पाडून त्यावर गेल्या १५ वर्षात एकही वीट न रचल्यामुळं सिडकोनं हा भूखंड परत करण्याचे आदेश भुजबळांना दिले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून भुजबळांचा भूखंडाचा हा गैरव्यवहार उघड करण्यासाठी तसंच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार सिडकोकडून भुखंड परत करण्याचे आदेश ट्रस्टला देण्यात आल्याचं दमानिया यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं.


दमानिया यांनी केला पाठपुरावा

सिडकोनं २००३ मध्ये कोट्यवधी रुपये बाजारभाव असलेला काही एकरचा हा भूखंड भुजबळांच्या एमईटी ट्रस्टसाठी नाममात्र किंमतीत दिला होता. त्यानुसार दोन वर्षात या भूखंडावर महाविद्यालयाचं बांधकाम होणं अपेक्षित होतं. पण पंधरा वर्षे झाली तरी २००३ ते २०१८ पर्यंत या भूखंडावर कोणत्याही प्रकारचं बांधकाम केलं गेलं नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणांकडून कवडीमोल दरात भूखंड लाटण्याचा हा प्रकार दमानिया यांनी उघडकीस अाणला होता. दमानिया यांनी याप्रकरणी सिडकोकडे कारवाईसंदर्भात पाठपुरावा केला होता.


सिडकोनंही घेतली गंभीर दखल

यासंबंधीची आवश्यक कागदपत्रं आणि पुरावेही दमानिया यांनी सादर केले होते. त्यानुसार बांधकामासाठी पुरेसा निधी नसल्याचं कारण भुजबळ कुटुंबियांकडून सिडकोला दिलं जात होतं. पण शेवटी सिडकोनंही याप्रकरणाची गंभीर दखल घेत भूखंड परत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत भूखंड परत करण्यासंबंधी MET ट्रस्टला बजावली आहे.


हेही वाचा - 

छगन भुजबळांना ईडीचा पुन्हा दणका, कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा