Advertisement

छगन भुजबळांना ईडीचा पुन्हा दणका, कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच


छगन भुजबळांना ईडीचा पुन्हा दणका, कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच
SHARES

बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या तुरुंगात असून ईडीकडून त्यांच्या मालमत्तांची चौकशी करण्यात येत आहे. याचदरम्यान, मंगळवारी ईडीने छगन भुजबळ आणि त्यांच्या अन्य साथीदारांची एकूण २०.४१ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. आत्तापर्यंत ईडीने भुजबळांची एकूण १७८ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यादरम्यान, अनेकदा त्यांनी जामिनासाठी अर्ज केले आहेत. मात्र, त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. भुजबळांच्या जामीन अर्जावर या आठवड्यात न्यायालय निर्णय देणार आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) कलम ४५ मुळे राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर गदा येते, असे भुजबळ यांच्या वकिलांनी सांगितले होते. छगन भुजबळांच्या वतीने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालांचा दाखलाही देण्यात आला होता. त्यामुळे, भुजबळ यांना जामिन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, याचदरम्यान नेमकी ही कारवाई झाल्याने भुजबळ कुटुंबीयांना हादरा बसला आहे.हेही वाचा

नाथाभाऊंचा 'भुजबळ' करणं मनोरंजनाचा विषय - एकनाथ खडसे


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा