Advertisement

नागपूर हिवाळी अधिवेशात आमदार आले मुद्द्यांवरून गुद्द्यांवर

विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार मुद्द्यावरून गुद्द्यावर आले. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये यावेळी धक्काबुक्की झाल्याचं म्हटलं जात आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशात आमदार आले मुद्द्यांवरून गुद्द्यांवर
SHARES

नागपूर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांच्या आक्रमकतेने टोक गाठल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार मुद्द्यावरून गुद्द्यावर आले. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये यावेळी धक्काबुक्की झाल्याचं म्हटलं जात आहे. यावरून सभागृहात एकच गोंधळ झाला.

हेही वाचा- युवाशक्तीचा बाॅम्ब पेटवू नका, ‘जामिया’वरून केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांचा इशारा

भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात ही धक्काबुक्की झाल्याचं म्हटलं जात आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

 हेही वाचा- ‘या’ तारखेला होणार राज्य मंत्रिमंडळ विस्तार

त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जमा होत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यावेळी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या हातात बॅनर होता. हा बॅनर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यावरून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दोन्ही आमदारांना समज द्यावी लागली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा