भायखळ्यात तिकीट वाटपावरून काँग्रेसची गोची

  Mazagaon
  भायखळ्यात तिकीट वाटपावरून काँग्रेसची गोची
  मुंबई  -  

  कामाठीपुरा - काँग्रेसमधील मनोज जामसुतकर आणि जावेद जुनेजा या दोन गटांमध्ये नगरसेवकाच्या तिकिटावरून वाद निर्माण झाल्याचं चित्र सध्या भायखळ्यातल्या कामठीपुरात पाहायला मिळत आहे. मनोज जामसुतकर हे सध्याचे काँग्रेसचे 208चे नगरसेवक आहेत. तर जावेद जुनेजा हे बी वॉर्डमधील 223 मुसाफिरखाना येथील काँग्रेसचे नगरसेवक आहेत. प्रभाग रचनेत बदल झाल्यामुळे प्रभाग क्र. 208 आणि 223 हे दोन्ही वॉर्ड महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे जामसुतकर आणि जुनेजा यांची गोची झाली आहे. हे दोन्ही उमेदवार कामाठीपुरा प्रभाग क्र. 213 मधून इच्छुक आहेत. मात्र जावेद जुनेजा हे मुंबादेवी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांच्या जवळचे मानले जातात, म्हणून त्यांनाच 213 मधून तिकीट मिळणार अशी चर्चा केली जात आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.