Advertisement

एक दौड संविधानाच्या सन्मानासाठी!


एक दौड संविधानाच्या सन्मानासाठी!
SHARES

सामाजिक न्याय विभागातर्फे रविवारी सकाळी वरळी सी फेस (जे. के कपूर चौक) ते चैत्यभूमी अशी संविधान सन्मान दौड आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत उपस्थित सर्व मान्यवर, दौड मध्ये सहभागी खेळाडूंनी संविधानाच्या प्रस्ताविकेचं सामूहिक वाचन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संविधान दौडला झेंडा दाखवल्यावर दौडची सुरवात झाली.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, श्रीलंकेच्या राजदूत सरोजा सिरीसेना, आ. भाई गिरकर, सुनिल शिंदे, मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले आदी उपस्थित होते.



या देशाची शान आहे संविधान- आठवले

भारताचं संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधूत्वाची देणगी नागरिकांना मिळाली आहे. भारतीय संविधानाने 'एक व्यक्ती एक मत' या तत्वाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. केंद्र सरकारने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिल येथील जमीन दिल्याचं, यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.


काय आहे संविधान दिन?

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोंव्हेबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना देशाला सुपूर्द केली. संविधानाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, समता व बंधुत्वाच्या तत्वावर देशाचा राज्यकारभार सुरु आहे. संविधानाने जनतेला मुलभूत अधिकार दिले आहेत. संविधानाबाबत जनतेमध्ये जाणिव जागृती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. आजची संविधान सन्मान दौड आणि गौरव यात्रेचं आयोजन यासाठी केल्याचं राजकुमार बडोले यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा